Sunday, February 26, 2023

 माझ्या आयुष्यात मी कथा कमी लिहिल्या अमेरिकेचे अध्यक्ष आले तेव्हाची गोष्ट हा माझा एकमेव प्रकाशित कथासंग्रह ! त्यामुळे मुळातच कथेवर लिहिण्याचा मला अधिकार किती हा प्रश्न आहे तरीही लिहितोय 

मर्ढेकरांच्या गाडगीळांवरच्या लेखनाने आधुनिक कथेला आधार मिळाला आणि आधुनिक नवतेत कथा कविता केंद्रस्थानी आली तिसऱ्या देशी नवतेत नेमाडेंच्यानंतर कविता कादंबरी केंद्रस्थानी आली नवतेचे पायोनियर लोक काय करतात हे फार महत्वाचे असते देशीवाद्यांनी कथा केंद्रस्थानावरून हलवली खरी पण चांगले कथाकार येत राहिले अगदी दिलीप चित्रेंनीही उत्तम कथा लिहिलेत ए व्ही जोशी दुर्लक्षित राहिले नाहीत पण मेनस्ट्रीममध्ये त्यांचे नाव आले नाही दिलीप चित्रे , श्याम मनोहर , रंगनाथ पाठारे हे कविता कादंबरीमुळेच गाजले कथांच्यामुळे न्हवे जोवर कथाकार समीक्षक निर्माण होत नाहीत तोवर कथांच्याकडे कथाकारांच्याकडे लक्ष्य जाणे अवघड ! सत्यकथेने कथा अतिप्रतिष्ठित केली नेमाडेंनी ती अप्रतिष्ठित केली सुवर्णमध्य कथा प्रतिष्ठित करणे हा आहे चौथ्या नवतेने तो करणे आवश्यक आहे सौष्ठवला कुणीही कथा पाठवल्या नाहीत का पाठवल्या नाहीत ? बहुदा अभिधालाही ! वास्तविक पंकज कुरुलकर सारखे नव्या दमाचे कथाकार यायला सुरवात झाली होती तरीही नाहीच . आम्हीही कथेला प्रतिष्ठा द्यायला कमी पडलो पण चौथ्या नवतेच्या कथा किती लिहिल्या गेल्या ? आणि लिहिल्या गेल्या तर त्या आमच्यापर्यंत का पोहचल्या नाहीत ?ह्यावर काहीही बोलायला गेलं कि मग तू लिही म्हणून उत्तर येणार मीच का लिहायचे / ज्यांनी कथेत काम केलंय त्यांनीच ह्यावर जास्त लिहायला हवं 

AAA

================================================

जागतिक मातृभाषा दिनाच्या सर्व मातृभाषांना व मातृभाषिकांना शुभेच्छा !

==========================================================

JKKKK